कुख्यात डॉन अरुण गवळीला सुरक्षेविना पॅरोल मंजूर

मुंबई: कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी बाहेर येणार आहे. अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात कैद आहे. मुलाच्या लग्नासाठी बाहेर येणार आहे. 17 नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचं लग्न आहे. त्यासाठी पॅरोलची मागणी केली होती. चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.

पोलिसांच्या संरक्षणासह गवळीने मुंबईला जावं अशी अट कारागृह प्रशासनाने घातली होती. मात्र याचा खर्चही अरुण गवळीला करावा लागेल अशी अट घालण्यात आली होती. या विरोधात अरुण गवळीने न्यायालयात दाद मागितली होती. आता अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे पण पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाता येईल असा निर्णय कोर्टाने दिला आहे.



गुंड अरुण गवळी याने मुलाच्या लग्नासाठी मागितलेल्या पॅरोलला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजुरी दिली आहे. मुलाचे लग्न असल्याने पॅरोल मिळावा म्हणून कारागृह प्रशासनाकडे त्याने अर्ज केला होता. प्रशासनाने चार दिवसांचा पॅरोल मंजूर करीत पोलिस फौजफाट्यासह नियोजित स्थळी जावे, अशी अट घातली. या विरोधात गवळीने नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करीत विनासुरक्षा आठ दिवसांचा पॅरोल मिळावा, म्हणून न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर चार दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.सर्व बाजू लक्षात घेत न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर चार दिवसांचा पॅरोल मंजूर केला. १७ नोव्हेंबर रोजी डॅडीच्या मुलाचे लग्न असून अतिरिक्त चार दिवसांच्या पॅरोलसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने