अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी; सलग दुसऱ्यांदा GST संकलन 1.50 लाख कोटी पार.

मुंबई : देशातील कर संकलनाबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST चे संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे, अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे.ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी कलेक्शन 1,51,718 कोटी रुपये होते. हे कलेक्शन आजपर्यंतचे दुसऱ्यांदा करण्यात आलेले सर्वोच्च जीएसटी कलेक्शन आहे. यापूर्वी, एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक जीएसटी कलेक्शन करण्यात आले होते. हा सलग 8 वा महिना आहे जेव्हा GST संकलन 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.



अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण GST संकलन 1,51,718 कोटी रुपये होते. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय गुड सर्व्हिसेस टॅक्सचा (CGST) आकडा 26,039 कोटी रुपये होता. तर, राज्य गुड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच SGST 33,396 कोटी, IGST 81,778 कोटी आणि सेस 10,505 कोटी इतका आहे. 

गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2021 मध्ये जीएसटी कलेक्श्नन 1,30,127 कोटी रुपये होते. तर, हेच कलेक्शन सप्टेंबर 2022 मध्ये एकूण GST कलेक्श्नन 1,47,686 कोटी रुपये होते. ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेले GST कलेक्शन हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 26 टक्के अधिक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने