"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत"

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर राज्याच्या राजकारणात दावे-प्रतिदावे सुरू झाले. अशातच आता चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे. यामुळे शिंदे यांच्याविरुद्ध ठाण्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.




बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिंदे यांच्या बंडामुळे ठाण्यात त्यांच्याबद्दल नाराजी पसरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव होईल. छगन भुजबळ, नारायण राणे पडले. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार. फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व 40 आमदारांचा पराभव होईल, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

फडणवीस हुशार माणूस त्यांनी काँग्रेसचे 22 आमदारही तयार ठेवलेत

कोर्टातील सुनावणीमध्ये शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकतं. हे आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार करून ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने