टाटांच्या एअर इंडियात आता नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली

मुंबई : टाटा समूह एअर इंडियाला पुन्हा जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात एअर इंडियाची कमान टाटांच्या हाती आल्यापासून त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत.दरम्यान, आता क्रू मेंबर्सच्या ग्रूमिंगसाठीदेखील नव्या गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता महिला आणि पुरुष क्रू मेंबर्सना या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वतःला रेडी व्हावे लागणार आहे. नव्या गाईडलाईननुसार, महिला क्रू मेंबर्ससाठी टिकलीचा आकार, बांगड्यांची संख्या आणि लिपस्टिक आणि नेलपेंटचा रंग निश्चित करण्यात आले आहेत.



एअर इंडियाच्या नवीन गाईडलाईनमध्ये कर्मचाऱ्यांना ऑफ-ड्युटी कंपनीचा गणवेश आणि अॅक्सेसरीज न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय क्रू मेंबर्सना केसांना जेल लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, ज्या पुरुष क्रू मेंबर्सच्या डोक्यावरीस केस कमी झाले असतील त्यांना आता पूर्णपणे हेअर स्टाईल बदलावी लागेल. क्रू कटवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.महिला क्रू मेंबर्सना आता मोत्याचे कानातले न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय महिला क्रू मेंबर्स त्यांच्या कानात फक्त सोन्याचे किंवा चांदीचे गोल आकाराचे झुमके घालू शकणार आहेत. तसेच ०.५ सेमीचीच टिकली लावावी लागणार आहे. याशिवाय विमान प्रवासात महिलांना हातात केवळ एकच बांगडी घालण्याची परवानगी असेल, ज्यामध्ये कोणतेही डिझाइन किंवा स्टोन नसावे.

महिला केबिन क्रू यापुढे हाय टॉप नॉट्स हेअरस्टाइल करू शकणार नाही. केसांमध्ये फक्त चार काळ्या बॉबी पिनला परवानगी असेल. याशिवाय आयशॅडो, लिपस्टिक, नेल पेंट आणि केसांचा रंगही ठरवून देण्यात आला आहे. ज्या महिला आणि पुरूष क्रू मेंबर्सचे केसं पांढरे झाले आहेत त्यांना यापुढे केसांना रंग लावावा लागणार आहे.केसांना लावण्यात येणारे हे रंग नैसर्गिक असावे असेही या गाईडलाईन्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. केसांना फॅशनेबल रंग किंवा मेंदी लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मानेवर, मनगटावर आणि घोट्यावर कोणतेही धार्मिक चिन्ह गोंदवण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने