इलॉन मस्क यांच्या Halloween Outfit वरून Twitter वर मिम्सचा पाऊस

अमेरिका :जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क ट्विटर मायक्रोब्लॉगिंग साइटचे प्रमुख बनले. इलॉन मस्क आपल्या वक्तव्यांनी आणि कृतीने नेहमीच चर्चेत असतात. आता ट्विटरच्या चर्चेनंतर ते आता आणखी एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. यावेळचं कारण थोडं वेगळं आहे.



2 दिवसांपूर्वी म्हणजेच 31 ऑक्टोबरला हॅलोविनचा दिवस होता. यावेळी इलॉन मस्कही एका वेगळ्या अवतारात दिसून आले. त्यांनी ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो हॅलोविन आउटफिट घातलेले दिसून येत आहेत. इतकंच काय तर त्यांची आईसुद्धा या फोटोत आहे. हा फोटो पाहून नेटकरी मिम्सचा पाऊस पाडत आहेत.

इलॉन मस्क यांनी घातलेला आउटफिट संभ्रमात टाकणारा आहे. नेमकं हे आउटफिटकोणतं आहे यात सगळे गोंधळलेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी स्वतःच त्याच्या आउटफिटला नाव द्यायला सुरुवात केली आहेत.काही लोक त्याला मार्वल सुपरहिरो म्हणत आहेत. काहींनी त्याची तुलना ‘आयर्न मॅन’शी केली आहे, तर काही युजर्सही त्याचा नवा अवतार पाहून मीम्स शेअर करण्यात आनंद घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने