शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दलची मोठी अपडेट

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरद पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना काल संध्याकाळीच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर सध्या रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. त्यांना आज सकाळी अकरा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.



पण शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी abp माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवार यांना बर होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील अशी सध्याची माहिती आहे. उद्यापासून राष्ट्रवादीचे शिबिर सुरू होणार आहे. या शिबिराला शरद पवार मार्गदर्शन करणार होते. अजूनही त्यांना 2 दिवस तरी पूर्णपणे बर होण्यासाठी लागतील त्यामुळे त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे.

शरद पवार अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, त्यांना आणखी एक ते दोन दिवस बरे होण्यासाठी लागतील. त्यामुळे ते या शिबिराला हजर राहता येणार नाही. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने