ऋषी सूनक धर्मानं हिंदू पण मनानं ब्रिटिश! युकेचे राजदूत असं का म्हणाले?

मुंबई : भारतीय वंशाचे युकेचे पंतप्रधान ऋषी सूनक हे धर्मानं हिंदू आहेत पण मनानं आणि हृदयातून ते ब्रिटिश व्यक्ती आहेत, असं विधान भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स अलिस यांनी केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. आधुनिक युके वैविध्यपूर्ण असल्यानचं ऋषी सूनक हे सर्वोच्चपदी पोहोचू शकले. सूनक हे या पदासाठी सक्षम व्यक्ती असून आपली बुद्धीमत्ता कशी वापरायची हे त्यांनी दाखवून दिलं आहे. ब्रेक्ग्झिटनंतर भारत-युकेचं नात कसं आहे यावर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.



"सध्याचं जग हे भूराजकीयदृष्ट्या तणावाखाली आहे. यामध्ये आपल्याला स्थलांतराची, व्यावसायिक परस्पर सहकार्य धोरणांची गरज आहे. तसेच बोरिस जॉन्सन आणि PM मोदी यांच्यातील चांगले संबंध पुढे लिझ ट्रस आणि ऋषी सूनक यांच्यापर्यंत सुरु राहतील. भारताची भरभराट झाल्याशिवाय ब्रिटनची भरभराट होणारे जग आपण पाहू शकत नाही. त्यामुळं भविष्यात हितसंबंधांची परस्परता अधिक घट्ट होईल," असंही यावेळी एलिस म्हणाले.

विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबतच्या प्रश्नांवर ते म्हणाले, "ही आता सरकारी बाब नाही आणि प्रत्यार्पणावर तीन वर्षांपूर्वी स्वाक्षरी झाली होती. हा न्यायालयाचा विषय आहे. आम्हाला यूके ही फरारी लोकांसाठीची जागा बनवायची नाही. न्यायाची चाकं हळूहळू वळतात, पण ती वळतातच" अशा शब्दांत अॅलिस यांनी भूमिका स्पष्ट केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने