10 नोव्हेंबर हा दिवस 'शिवप्रताप दिन' म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागची शौर्य कथा

मुंबई : प्रत्येक मावळ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. आजही अफजलखानाचा वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.आजच्या लेखात आपण 10 नोव्हेंबर हा दिवस  'शिवप्रताप दिन' म्हणून का साजरा केला जातो?आणि त्यामागची शौर्य कथा काय आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.



स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेची आठवण करुन देणारा हा आजचा दिवस आहे.उंच आणि शक्तिशाली धिपाड अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारले.त्यावेळी बिजापूरच्या राजा अदिलशहा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळविले होते. 1659 मध्ये बिजापूरचा राजा असणाऱ्या आदिलशाहसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे जणू एक मोठे भयंकर संकट म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. आदिलशहाला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर जिवाने संपविले नाही तर ते आपल्यासाठी अंत्यत धोकादायक ठरू शकतात. 

या पूर्वी देखील आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला होता.परंतु त्या मध्ये त्याला यशच आले नाही. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी त्याने उंच आणि शक्तिशाली धिपाड अशा अफजल खानाची स्वराज्यात पाठवणी केली. तो दिवस होता 10 नोव्हेंबर1659 चा.प्रतापगडावर झालेली अफजलखान आणि छत्रपती शिवरायांची भेट आणि त्या भेटीत अफजलखानाने दिलेला दगाफटका ज्यास तोडीस तोड असे शिवरायांनी दिलेले उत्तर आणि अफजलखानाचा केलेला वध या सर्व गोष्टी आजही तितक्याच ताज्या आहेत. मराठ्यांच्या साम्राज्यावर चाल करुन आलेल्या या हुशार, बलाढ्य, शक्तिशाली अफजल खानाला शिवाजी महाराजांनी आपल्या अचूक रणनीतीने ढेर केले. या घटनेने प्रजा सुखी झाली आणि स्वराज्यावर आलेले संकट छत्रपतींनी पळवून लावल्याने गावागावात आनंदोत्सव राहिला होता. त्यांच्या या विश्वासाच्या जोरावर छत्रपतींनी रयतेचे राज्य घडवले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत! आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते. जनमानसांत आपल्या गुणांमध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवप्रताप दिनी त्रिवार मानाचा मुजरा!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने