शनिवार वाडा परिसरातील दर्गा काढा; नव्या वादाला तोंड

पुणे: इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले आहे. दरम्यान, पुण्यात शनिवारवाडा परिसरातील दर्गा काढा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्रताप गडावर जिवा महाले यांचे स्मारक बांधा अशी मागणी ब्राम्हण समाजाने पुन्हा एकादा केली आहे. दरम्यान, हिंदू महासंघाने शनिवार परिसरातील दर्गा हटवा अशी मागणी केली आहे. हजरत शाह ख्वाजा सैयद शाह पीर मुकबुल हुसेन असे या दर्ग्याच्या नाव आहे. या दर्ग्यासंदर्भात ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला आहे.शनिवार वाड्याच्या इतिहास हा कागदोपत्री उपलब्ध आहे. असा कोणताही दर्गा या आधी होता असं इतिहासात दिसत नाही. असा दावा हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी केला आहे.




माध्यमांशी बोलताना दवे म्हणाले, 1233 साली असा कोणी पीर बाबा पुण्यात आल्याचा कोणताही उल्लेख सापडत नाही. शनिवार वाडा भूमी पूजा पासून ते वास्तू आणि इथल्या प्रत्येक घटनेचा इतिहास उपलब्ध आहे. यात कोठेही या दरग्याचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे हा दर्गा नंतर बांधण्यात आला आहे.अनेकवेळी पुरातत्व खात्याला पत्रव्यवहार केला आहे. पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. राज्य सरकारला सर्व भूमिका माहिती असतं. १५ दिवसात समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर कोर्टात याचिका दाखल करणार अशी माहितीही दवे यांनी यावेळी दिली. त्यामुळे पुरातत्व खातं काय भूमीका घेत याकडे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने