प्रतापगडापाठोपाठ संग्रामदुर्गावरील अतिक्रमणही हटवलं!

पुणे: पुण्यातल्या चाकणजवळच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमण आज हटवण्यात आलं आहे. प्रतापगडापाठोपाठ या किल्ल्यावरही ही कार्यवाही करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीने पुरातत्व विभागाने हे बांधकाम हटवलं आहे.


पुण्यातल्या चाकणजवळ हा संग्रामदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून चार वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र हे बांधकाम हटवलं जात नव्हतं. बुधवारी अखेर पोलिसांच्या मदतीने पुरातत्व विभागाने हे अतिक्रमण हटवलं आहे.या किल्ल्यावर पत्राशेड टाकण्यात आलं होतं. हे किल्ल्याच्या वास्तूला बाधा पोहचवली जात होती. किल्ले संरक्षणासाठी काम करणाऱ्या काही संघटनांनी याविषयी तक्रार दिली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाने ही कारवाई केली आहे. कालच प्रतापगडावरच्या अफजल खानच्या कबरीजवळचं अतिक्रमणही हटवण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने