भाजपालाही लागलं बंडखोरीचं वारं? अनेक आमदार नाराज

गुजरात: गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणूकीसाठी तिकीट नाकारले म्हणून भाजपचे एक विद्यमान आमदार तसेच चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा इशारा दिला आहे. समर्थकांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलू असे या नेत्यांनी सांगितले.माजी आमदार हर्षद वसावा यांनी नांदोड येथून शुक्रवारीच अर्ज भरला आहे. ही जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. ही जागा सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. भाजपने येथून डॉ. दर्शना देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. वसावा हे भाजपचे आदिवासी समाजातील महत्त्वाचे नेते मानले जातात. ते पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. पूर्वीच्या राजपीपला मतदारसंघाचे त्यांनी २००२ ते २०१२ दरम्यान प्रतिनिधित्व केले आहे.



वसावा म्हणाले की, इथे एक मुळ भाजप आणि दुसरा नकली भाजप आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला फेकलेल्यांना आणि पक्षाची सूत्रे नवशिक्यांकडे दिलेल्यांना आम्ही उघडे पाडू.दरम्यान, बडोदा जिल्ह्यातील वाघोडीया येथील सहा वेळचे आमदार मधू श्रीवास्तव यांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा घोषणा केली. तेथे भाजपने अश्विन पटेल यांना संधी दिली आहे. पद्रा येथे चैतन्यसिंह झाला यांना तिकीट मिळाल्यामुळे दिनेश पटेल ऊर्फ दिनू मामा हे नाराज झाले आहेत. कर्जन येथे अक्षय पटेल यांना पसंती मिळाल्याने सतीश पटेल दुखावले गेले आहेत. अक्षय यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. २०२० मध्ये ते भाजपमध्ये आले आणि त्यांनी पोटनिवडणूक जिंकली. केशोद येथे देवभाई मालम यांना तिकीट मिळाल्यामुळे अरविंद लाडानी नाराज आहेत.

गढवी खंबालियातून रिंगणार

अहमदाबाद, ता. १३ (वृत्तसंस्था) ः आम आदमी पक्षाचे गुजरातमधील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे खंभालिया मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. शेतकरी, बेरोजगार युवक, महिला आणि व्यापारी यांच्यासाठी अनेक वर्षांपासून आवाज उठविणारे इसुदान गढवी जाम खंभालिया येथून निवडणूक लढवतील, श्रीकृष्णाची पावन भूमी असलेल्या गुजरातला एक नवा आणि चांगला मुख्यमंत्री मिळेल, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने