Akshay Kumar ने अजून भारतीय नागरिकत्व का घेतलं नाही? स्वतः दिलं उत्तर

मुंबई: अभिनेता अक्षय कुमारची लोकप्रियता प्रचंड असली तरी अद्याप तो भारतीय नागरिक नाही. त्याच्या नागरिकत्वावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. पण अजून त्याने भारतीय नागरिकत्व का घेतलेलं नाही?त्याने स्वतःच या बद्दल उत्तर दिलं आहे.हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिटमध्ये अक्षय कुमारला पासपोर्टबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्याबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, "माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, याचा अर्थ मी कोणत्याही भारतीयपेक्षा कमी नाही. किंबहुना मी जास्त भारतीय आहे. मला ९ वर्षांपूर्वी पासपोर्ट मिळाला होता. माझे चित्रपट चांगले चालले म्हणून मी यात इतकं लक्ष घातलं नाही वगैरे वगैरे बोललं जातं."





अक्षय कुमार पुढे म्हणाला, "हा मी २०१९ मध्ये बोललो होतो की मी पासपोर्टसाठी अर्ज दिला आहे. पण महामारी आली आणि सगळं काही साधारण दीड एक वर्षांपर्यंत बंद झालं होतं. मला रिनाऊंस लेटरही मिळालं. लवकरच माझा पासपोर्टही मिळेल." या आधी अनेकदा अक्षय कुमारच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.अनेकदा अक्षय कुमारला कॅनेडियन कुमार म्हणून ट्रोल केलं जातं. त्याबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, "मला वाटतं की लोक याच गोष्टीवर ठाम आहेकी मी सगळ्यांना माझा पासपोर्ट दाखवावा आणि सांगावं की मी भारतीय आहे. मला नाही वाटत लोकांना असं काही बोलण्याची संधी मिळाली, म्हणून मी यासाठी अर्ज केला आहे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने