शिक्षण घ्यावे पण परीक्षा कशाला? इंदिरा गांधींची ती खास गोष्ट...

दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांचा कार्यकाळ फार महत्वाचा मानला जातो अशा इंदिरा गांधींची आज जयंती. भारतीय महिला राजकारणातही ही महिला अग्रस्थानी होती. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात त्यांनी जेवढी कामे पार पाडतील त्याची एक यादी करता येईल असे शक्यच नाही. त्यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या घडामोडी घडून आल्यात. देशाचा कायापालट करण्यात ज्यांचा महत्वाचा हात आहे अशा इंदिरा गांधीना शिक्षणाची तर आवड होती पण परीक्षा देणे त्यांना महत्वाचं वाटत नसे.



भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी यांची आज १०५ वी जयंती आहे. वडिल पंतप्रधानपदी असल्यामुळे इंदिरा यांना राजकारणाचा वारसा लाभला होता. इंदिरा गांधी यांनी वयाच्या २१ व्या वर्षात ऑक्सफर्ड विद्यापिठ सोडून भारतीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुढे हा प्रवास काँग्रेस अध्यक्षतेहून थेट पंतप्रधानपदी पोहोचला.इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांचे खाजगी डॉक्टर डॉ. माथुर हे होते. त्याची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना दिवसभऱ्यात एकदा तरी ते तपासणीसाचा आग्रह करयाचे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी सर्वतोपरी त्यांची होती. इंदिरा गांधीच्या पंतप्रधानपदातील बहुतांश कामाची साक्ष देणारे एक व्यक्ती म्हणजे त्यांचे खाजगी डॉक्टर. त्यांनी त्यांच्या शिक्षणासंबंधित असा एक किस्सा सांगितलाय जो फार कमी लोकांना हा किस्सा माहित असावा.

इंदिरा गांधी यांना शिकण्याची आवड होती. मात्र त्यांना परीक्षा देणे आवडत नसे. त्यांना पीएचडीचा अभ्यास केला होता. मात्र त्यासंदर्भात त्यांनी कुठलीही परीक्षा दिली नव्हती. असे त्यांच्या डॉक्टरांनी लिहीलेल्या एका पुस्तकात सांगितले आहे. इंदिरा गांधी त्यांचा बराच वेळ महाविद्यालयात घालवत असे. त्यांना शिकायला आवडत असे. मात्र शिकून केवळ परीक्षा देणे म्हणजे काही ज्ञान नव्हे असे त्या म्हणायच्या.खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याचा आदर करत इंदिरा त्यांची प्रकृती जपण्यासाठी त्यांच्या व्यस्त कार्यकाळातला थोडा का होईना पण वेळ द्यायच्या. नाहीतर आरोग्याची विशेष काळजी घेण्यापेक्षा त्यांना त्यांची कामे महत्वाची वाटे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने