नोकरकपातीबद्दल ट्विटरविरुद्ध खटला

न्यूयॉर्क : ट्विटरमधील ३,७०० कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकण्याच्या एलॉन मस्क यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. फेडरल आणि कॅलिफोर्निया कायद्याचे उल्लंघन करून पुरेशी सूचना न देता कंपनी आम्हाला काढून टाकत आहे, असे सांगत काही कर्मचाऱ्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे.



खटला दाखल झाल्याबद्दल ट्विटरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या महिन्यात एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरमध्ये ही कंपनी विकत घेतल्यानंतर खर्चात कपात करण्यासाठी कर्मचारी कपातीची योजना जाहीर केली होती.‘डब्ल्यूएआरएन’ या कायद्यान्वये, कर्मचाऱ्यांना काढून टाकताना मोठ्या कंपन्यांना कमीत कमी ६० दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागते. या खटल्यामुळे आता डब्ल्यूएआरएन कायद्याचे पालन करण्याची आवश्यकता असलेला आदेश जारी करण्यास न्यायालय ट्विटरला सांगू शकेल, तसेच कर्मचाऱ्यांनी खटल्यात सहभागी होण्याचा अधिकार सोडून द्यावा अशा स्वरुपाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास ट्विटरने कर्मचाऱ्यांना सांगितले, तर तसे करण्यास न्यायालय कंपनीला रोखू शकेल.

यश अग्रवालची पोस्ट व्हायरल

ट्विटरमधून काढण्यात आलेला २५ वर्षीय भारतीय तरुण यश अग्रवालने ट्विटरवर त्याच्या आनंदी छायाचित्रासह एक पोस्ट शेअर केली असून, आहे. #lovetwitter आणि #lovewhereyouworked असे हॅशटॅग त्याने वापरले असून, त्याच्या सकारात्मक वृत्तीबद्दल युजर त्याचे कौतुक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने