भाजपच्या जडण-घडणीत मोलाचा वाटा असलेल्या लाल कृष्ण अडवाणींची शतकाकडे वाटचाल

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचा आज 95 वा वाढदिवस आहे. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराचीतील एका सिंधी कुटुंबात झाला. त्यांचे वडील किशनचंद अडवाणी हे व्यवसायिक होते. त्यांच्या आईचे नाव श्रीमती ग्यानी देवी होते.भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर अडवाणी यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात आले आणि बॉम्बेमध्ये स्थायिक झाले, जिथे त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.फेब्रुवारी 1965 मध्ये एलके अडवाणी यांचा कमला यांच्याशी विवाह पार पडला. त्यांना मुलगा जयंत आणि मुलगी प्रतिभा अशी दोन मुले आहे. त्यांच्या पत्नीचे 6 एप्रिल 2016 मध्ये निधन झाले. 2014 मध्ये ते शेवटची लोकसभा निवडणूक लढले.एलके अडवाणी यांना लहानपणापासूनच देशसेवेचे वेड होते. त्यांच्या मनात समाजाप्रती आपुलकीची भावना होती. त्यामूळेच मित्रांसोबत खेळायच्या कोवळ्या वयात वयाच्या 14 व्या ते आरएसएसमध्ये सहभागी झाले.



त्यावेळी ते कराची शाखेसाठी कार्यकर्ते म्हणून काम करत होते. कराचीत त्यांनी अनेक शाखा निर्माण करत संघाचे काम सर्वदूर पोहोचवले. अडवाणी यांची निष्ठा पाहून त्यांना भारतीय जनसंघाचे सदस्य होण्याची संधी मिळाली.श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये आरएसएसच्या सहकार्याने स्थापन केलेला राजकीय पक्ष जनसंघ आणि त्यासह इतर अनेक विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन झाले. अडवाणी आणि त्यांचे सहकारी अटलबिहारी वाजपेयी यांनी जनता पक्षाचे सदस्य म्हणून 1977 ची लोकसभा निवडणूक लढवली होती.पुढे जनसंघाच्या माजी सदस्यांनी जनता पक्ष सोडला. आणि नवीन भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. अडवाणी हे नूकत्याच जन्माला आलेल्या भाजपचे प्रमुख नेते बनले. ते 1986 ते 1991, 1993 ते 1998 आणि पुन्हा 2004-2005 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

भाजपला बनवले हिंदूत्ववादी चेहरा

सध्या भाजप हिंदूत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. यात मोठे योगदान लाल कृष्ण अडवाणी यांचे आहे. भाजपच्या सुरूवातीच्या काळात हिंदूत्ववादाचे बाळकडूच जणू लाल कृष्ण अडवाणी यांनी भाजपला पाजले. अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजप हा रामजन्मभूमीवरील अयोध्या मंदिराचा राजकीय चेहरा बनला.अडवाणींनी 1987 मध्ये भाजपला चालना मिळवण्यासाठी आणि हिंदुत्व विचारसरणीचे एकीकरण करण्यासाठी देशभरात रथयात्रा किंवा मिरवणुका काढल्या. प्रसंगी मोर्चेही काढले. अडवाणींनी 25 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथून पहिली रथयात्रा सुरू केली आणि शेवटी 30 ऑक्टोबर 1990 रोजी अयोध्येला पोहोचले.

रामजन्मभूमीचे शिल्पकार

अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी अनेकांनी कोर्टाच्या वाऱ्या केल्या. पण, तिथे मंदिर की बाबरी मशिद हा तिढा सुटत नव्हता. पण, अखेर मोदी सरकारच्या काळात यावर कोर्टाने निकाल दिला आणि तिथे राम मंदिर बांधण्याची तयारी सुरू झाली. यासंबंधी अनेकांनी लढा दिला. पण, लालकृष्ण अडवाणी यांना रामजन्मभूमी अभियानाचे शिल्पकार मानले जाते.कारण 1990 मध्ये अडवाणींनी अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी पहिली रथयात्रा त्यांनी काढली होती. या रथयात्रेत त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते. नंतर या यात्रेला राम रथयात्रा असे नावही देण्यात आले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या आदेशावरून अडवाणी यांना अटकही झाली होती.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने