पोलीस व्हॅनसमोर फोटो घेतो, आमचं काम झालं; मनसे नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी एक विधान केलं. या विधानानंतर त्यांच्या विरोधात मनसेने आक्रमक होत आंदोलन केलं आहे. याच वेळचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.



स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संतापले होते. त्यांनी राहुल गांधी यांची शेगावची सभा उधळून लावण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर मनसे नेते शेगावकडे निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. तिथेच या नेत्यांनी आंदोलन केलं. आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती पोलिसांशी हुज्जत घालत आहे.पोलिसांशी बोलताना हा व्यक्ती सांगतोय की आम्हाला फक्त पोलीस व्हॅनपुढे उभे करा. चहासुद्धा पाजू नका, प्रेसवाले फोटो घेतील, मग आमचं काम होईल, असा दावा हा व्हिडीओ शेअर होताना करण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांशी हुज्जत घालणारी व्यक्ती मनसेचा नेता आहे, असंही हा व्हिडीओ शेअर करताना केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने