वाह, क्या बात है! भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेत रचला इतिहास; बनल्या मेरीलँडच्या 'लेफ्टनंट गव्हर्नर'

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या (US Election) पार्श्वभूमीवर, यंदा भारतीय-अमेरिकन लोक प्रतिनिधीगृहात 100 टक्के आपला प्रभाव पाडू शकतात. दरम्यान, भारतीय-अमेरिकन अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे.लाखो यूएस मतदारांनी राज्यपाल, राज्य सचिव आणि इतर कार्यालयांचे प्रमुख निवडण्यासाठी मतदान केलं. दरम्यान, यामध्ये आणखी एका भारतीयानं अमेरिकेत इतिहास रचला आहे. भारतीय-अमेरिकन महिला अरुणा मिलर  या मेरीलँडमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर  पदावर विराजमान झालेल्या पहिल्या स्थलांतरित ठरल्या आहेत.




अरुणा मिलर कोण आहेत?

58 वर्षीय डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या अरुणा मिलर यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1964 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्या त्यांच्या आई-वडिलांसोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या. 1989 मध्ये त्यांनी मिसूरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अण्ड टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. अरुणा यांनी मॉन्टगोमेरी काउंटीमधील स्थानिक वाहतूक विभागासाठी 25 वर्षे काम केलं.

2018 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव

अरुणा मिलर यांनी 2010 ते 2018 पर्यंत मेरीलँड हाउस ऑफ डेलिगेट्समध्ये 15 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व केलं. 2018 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर त्यांना डेमोक्रॅट्सच्या वतीनं राज्यपालपदाचं उमेदवार बनवण्यात आलं. अरुणा यांचा विवाह डेव्हिड मिलर नावाच्या व्यक्तीशी झाला आहे. मिलर दाम्पत्याला तीन मुली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने