करवीर निवासीनी महालक्ष्मी मंदिरात यादवकालीन शिलालेख आढळला

 कोल्हापूर: इ.स. बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख श्री करवीर निवासीनी महालक्ष्मी मंदिरात आज मिळाला. यामुळेच मंदिराच्या इतिहासात आणखीन एक मौल्यवान भर पडली आहे. हा शिलालेख संस्कृत भाषेत, देवनागरी लिपीत, सोळा ओळीत आहे. साधारण २ फूट लांब व १ फूट रुंद आकाराचा असून तो मूळ मंदिराचा भाग असलेला व नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून याचा भिंतीकरिता वापर केलेला आहे. मंदिर प्राकारातील सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व भिंतीत हा शिलालेख आडवा आहे. मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्यासाठी सुरू केलेल्या संर्वधन प्रकल्पात सदर शिलालेख उजेडात आला आहे. प्रशासन व्यवस्थापनाने शिलालेखाचे भाषांतर झाल्यावर सविस्तर माहिती प्रकाशित करेल,असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी सांगितले.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने