पतंजलीच्या पाच औषधांवरील बंदीवरून कंपनीचे स्पष्टीकरण; म्हणाले, “आयुर्वेद विरोधी ड्रग…”

उत्तराखंड : उत्तराखंड सरकारने पतंजली समूहातील दिव्या फार्मसीच्या पाच औषध उत्पादनावर बंदी घातली आहे. मात्र, दिव्या फार्मसीकडून या वृत्ताचं खंडण करण्यात आलं आहे. तसेच, या वृत्ताचं ‘आयुर्वेद विरोधी ड्रग माफिया’ असा उल्लेख पतंजलीकडून करण्यात आला आहे.



उत्तराखंड सरकारने काही खोट्या माहिती आधारे दिव्या फार्मसीच्या पाच औषधांवर बंदी घातल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, पतंजलीकडून सांगण्यात आलं की, वृत्तपत्रांच्या बातम्यांचा हवाला देऊन उत्पादनांवर बंदी घातलेल्या आदेशाची प्रत अद्याप कंपनीला मिळालेली नाही. पण, यामागे ‘आयुर्वेद विरोधी औषध माफियांचा’ सहभाग असल्याचा संशय पतंजलीकडून व्यक्त करण्यात आला.

सरकारी विभागाने आपली चूक सुधारत दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा पतंजलीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी. नुकसान भरपाई नाही दिल्यास, कायदेशीर कारवाईला तयार रहावे, असा इशाराही पतंजलीने दिला आहे.उत्तराखंड औषध परवाना अधिकारी डॉ. जीसीएस जंगपांगी यांनी रक्तदाब, मधुमेह, गलगंड, काचबिंदू आणि उच्च कोलेस्ट्रॉलच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे उत्पादन थांबवण्यास पतंजलीला सांगितलं होते. तसेच, पतंजलीवर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पसरवल्याचा आरोपही करण्यात आला होता. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने