चित्रपट विनामूल्य पाहता यावा यासाठी अमिताभ बच्चन करायचे ‘हे’ काम; बिग बींनी सांगितलं गुपित

मुंबई :  ‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन लाखो रुपये जिंकतात. एक कोटी रुपयांची रक्कमही काही स्पर्धक मिळवतात. हा शो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. या कार्यक्रमात जसे स्पर्धक येत असतात तसेच कलाकारदेखील येत असतात. या कार्यक्रमात नुकतीच अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता या कलाकारांनी हजेरी लावली होती.



या दोन कलाकारांच्या येण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा आगामी ‘उंचाई’ हा चित्रपट. राजश्री प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा मल्टीस्टारकास्ट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हे दोन कलाकार कार्यक्रमात आले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील आहेत. सोनी वाहिनीने यादरम्यानचा एक प्रोमो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात अमिताभ बच्चन आपल्या मित्रांचे कसे स्वागत करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता यांनी या भागात खेळाबरोबरच भरभरून गप्पाही मारल्या.बोमन इराणी, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्याशी गप्पा मारताना अमिताभ यांनी त्यांच्या हॉस्टेलच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. हॉस्टेलमध्ये राहत असताना चित्रपटाच्या प्रेमापोटी त्यांनी काय काय केले हेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, “हॉस्टेलच्या दिवसांमध्ये माझ्याकडे पैसे खूप कमी असायचे आणि तेवढ्या पैशात चित्रपट पाहणे परवडायचे नाही. पण चित्रपट पाहण्याची मला खूप आवड होती. 

चित्रपटांवर असलेल्या या प्रेमापोटी मी सिनेमागृहाच्या सेक्रेटरींना सिनेमा बघू द्यावा अशी विनंती करत असे. त्या सेक्रेटरींना विनंती करून मी अनेक चित्रपट पाहिले आहेत. पण माझ्याकडे चित्रपट पाहण्यासाठी पैसे नसल्यामुळे मी विना तिकीट जमिनीवर बसून चित्रपट पाहायचो.” अमिताभ बच्चन यांच्या या उत्तरावर तेथे उपस्थित सर्वजण आश्चर्याचकित झाले.अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता यांची महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘उंचाई’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या या चित्रपटाच्या निमित्ताने ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. चित्रपटात या दिग्गज अभिनेत्यांच्या बरोबरीने सारिका आणि परिणीती चोप्रा यांचादेखील मुख्य भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने