"विरोधकांसोबतही काम करू"; रिपब्लिकन पार्टीला बहुमत, बायडन यांनी केलं अभिनंदन

अमेरिका : रिपब्लिकन पार्टीने अमेरिकी संसदेत बहुमत मिळवलं आहे. यामुळे पक्षाचा २०२४ च्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अजूनही पक्षाला अपेक्षित विजय मिळाला नसल्याने काहीसं निराशेचं वातावरण आहे. अजूनही काही जागांवरचा निर्णय आलेला नाही. त्यामुळे पक्षाची मतं आणखी वाढू शकतात.



रिपब्लिकन पक्षाच्या या विजयासाठी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकी नागरिकांच्या हितासाठी आपल्या राजकीय विरोधकांच्या सोबतीने आपण काम करू असं आश्वासनही बायडन यांनी दिलं आहे. रिपब्लिकन नेते केवीन मेकर्थी यांना त्यांनी बहुमत मिळवल्यानंतर शुभेच्छा देताना बायडन म्हणाले, अमेरिकी समुदायासाठी आपण रिपब्लिकन पक्षासोबत काम करणार आहोत.असोसिएटेड प्रेसने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, राष्ट्रपती बायडन यांनी अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आपला पक्ष डेमोक्रेटकडे बहुमत घेत पदभार स्विकारला होता. पण रिपब्लिकन पार्टीने आता एका सभागृहात बहुमत मिळवल्याने त्यांच्या उरलेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात अडचणी येऊ शकतात. कारण आता या सभागृहामध्ये नवीन कायदे, विधेयके पारित करणे अवघड जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने