अन् नितिन गडकरींनी केले मनमोहन सिंग यांचे कौतुक

मुंबई -देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडभरुन कौतुक केले. भारत मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. अशा शब्दात गडकरी यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असे नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.



टॅक्स इंडिया ऑनलाइन पोर्टल अवॉर्ड कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून आर्थिक सुधारणा सुरू करून भारताला नवी दिशा दिली होती. यामुळे देशात उदारमतवादी अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.तसेच, 'लिबरल अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली, त्यासाठी मनमोहन सिंग यांचा देश ऋणी आहे. अशी भावना व्यक्त करत गडकरी यांनी स्तुतीसुमने उधळली.

माजी पंतप्रधान सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकात मी महाराष्ट्रात मंत्री असताना रस्ता बांधण्यासाठी निधी उभारता आला होता, अशी आठवणही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने