दक्षिण कोरिया Kim Jong Un च्या पुन्हा रडारवर; उत्तर कोरियानं डागली 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं

 उत्तर कोरिया :उत्तर कोरियानं  पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी  घेतलीय. याआधी उत्तर कोरियानं तीन क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचा दावा केला जात होता. मात्र, नंतर ही संख्या 10 झाली आहे.उत्तर कोरियाच्या या कारवाईनं दक्षिण कोरिया ढवळून निघालंय. दक्षिण कोरियात उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या मोठ्या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. क्षेपणास्त्र चाचणीच्या काही तास आधी दक्षिण कोरियासोबत लष्करी सराव वाढवल्याबद्दल अमेरिकेवर  टीका झाली होती.



दक्षिण कोरियाच्या लष्करानंही  या संदर्भात दावा केलाय की, उत्तर कोरियाकडून त्यांच्या सागरी क्षेत्राजवळ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफनं  म्हटलंय, 'उत्तर कोरियाच्या वोंसल शहराजवळून सकाळी 8.51 च्या सुमारास क्षेपणास्त्र डागण्यात आलं आहे.'

उत्तर कोरियानं डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेपासून 26 किमी अंतरावर पडल्याचं दक्षिण कोरियाचं म्हणणं आहे. हा परिसर दक्षिण कोरियाच्या उलेंग बेटापासून 167 किमी अंतरावर आहे. उत्तर कोरियाकडून केल्या जाणाऱ्या अशा आक्रमक कारवायांना दक्षिण कोरिया विरोध करत आहे. उत्तर कोरियाशी सामना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेसोबत काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने