धोक्याची घंटा! भारतात 9 महिन्यांत 948 भूकंप; 200 पेक्षा जास्त वेळा हादरली पृथ्वी

नवी दिल्ली : जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांत भारतात वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा मोठ्या धोक्याचा इशारा आहे का? याबाबत चर्चा सुरुय. गेल्या 9 महिन्यांत भारतात असे 240 भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता 4 पेक्षा जास्त होती.काल रात्री नेपाळमध्ये  झालेल्या भूकंपाची तीव्रताही 4 पेक्षा जास्त होती. यापूर्वी 2015 मध्ये नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. नेपाळमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के भारताची राजधानी दिल्लीपर्यंत जाणवले. भूकंपामुळं नेपाळमध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळं लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं सांगितलं की, काल रात्री 1.57 च्या सुमारास हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील मणिपूर इथं होता.




गेल्या 9 महिन्यांत भारतात 948 भूकंप

भारतात काल रात्री झालेल्या भूकंपामुळं कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या या धक्क्यांमुळं लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. भारतात गेल्या 9 महिन्यांत आतापर्यंत 948 भूकंप झाले आहेत. तथापि, 240 भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 च्या वर होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (एनसीएस) उपलब्ध आकडेवारीनुसार, यावर्षी 152 स्थानकांवरून 1090 भूकंपाची नोंद झालीय. मात्र, भारत आणि आसपासच्या देशांमध्ये अशा प्रकारच्या केवळ 948 भूकंपांची नोंद झाली आहे. NCS कडं उपलब्ध असलेला हा डेटा या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचा आहे.

अलार्म सिस्टम बनवण्याची गरज

भारतात या वर्षी आतापर्यंत झालेल्या भूकंपांची संख्या 1000 च्या पुढं गेली असावी, असा अंदाज आहे. जानेवारी ते सप्टेंबर 948 पर्यंत भूकंप, म्हणजे दर महिन्याला 105 पेक्षा जास्त भूकंप. ही धोक्याची घंटा आहे का? कमी तीव्रतेच्या भूकंपांपासून विशेष धोका नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असेल तर ती चिंतेची बाब आहे. म्हणून, आपल्याला अलार्म सिस्टम बनवण्याची गरज आहे. यामुळं लोकांना भूकंपाच्या काही मिनिटांपूर्वीच माहिती मिळेल.

भारतात 2 तीव्रतेच्या भूकंपानं पृथ्वी हादरली

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या मते, भारतात उच्च तीव्रतेचे भूकंप सहसा दुर्मिळ असतात. या वर्षी देशात जाणवलेल्या सर्वाधिक तीव्रतेच्या भूकंपाबद्दल बोलायचं झालं तर, काल रात्री नेपाळमध्ये आलेला 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप त्यापैकीच एक आहे. त्याच वेळी, दुसरा अंदमान-निकोबार बेटांपासून 431 किमी अंतरावर उत्तर सुमात्रा इथं 6.1-रिश्टर स्केलचा भूकंप होता. या भूकंपाचे धक्के भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक जाणवले. याशिवाय, भारतात 5 ते 5.9 तीव्रतेचे 14 भूकंप आणि 4 ते 4.9 तीव्रतेचे 224 भूकंप झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने