दाऊद अजूनही सक्रीय; ४ वर्षात हल्ल्यांसाठी पाठवले कोट्यवधी रुपये

मुंबई: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने आपल्या आरोपपत्रात टेरर फंडिंग संदर्भात मोठा खुलासा केला आहे. दाऊद टोळीने मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी रोख रक्कम पाठवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर ४ वर्षात हल्ल्यांसाठी कोट्यवधी रुपये पाठवण्यात आले आहेत. मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठ्या घटना घडवण्यासाठी दाऊद इब्राहिम आणि त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलने दुबईमार्गे पाकिस्तानातून 25 लाख रुपये पाठवले. एनआयएच्या आरोपपत्रानुसार हा पैसा सुरतमार्गे भारतात आला होता आणि नंतर मुंबईला पोहोचला होता. हे पैसे हवालाद्वारे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना पोहोचवले. असा दावा एनआयएने केला आहे.





एनआयएनं दाऊद, शकील, मोहम्मद सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूट यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. त्याचबरोबर रक्कमेची देवाण-घेवाण करण्यासाठी एका 'डर्टी मनी' हा कोड वर्डचा वापर करण्यात येत होता.तसेच, एनआयएने केलेल्या दाव्यानुसार, शब्बीरने ५ लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. एनआयएने सांगितले की हे लक्षात घेण्यासारखे आहे की ए-2 (शब्बीर) कडून ९ मे २०२२ रोजी त्याच्या घरावर करण्यात आलेल्या जप्तीदरम्यान ५ लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

पैसा दोन्ही बाजूंनी भारतातून फायनान्सर्सकडे जात होता. यात विशेषत: खंडणीच्या पाच स्वतंत्र घटनांची यादी केली आहे. एकामध्ये, आरिफ आणि शब्बीर यांच्यामार्फत हवाला मार्फत एका दशकात साक्षीदाराकडून सुमारे १६ कोटी रुपये उकळले गेले, असं एनआएनं आरोपपत्रात नमूद केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने