UNSC मध्ये भारताला मिळणार कायमचं सदस्यत्व? ब्रिटनपाठोपाठ फ्रान्सचाही पाठिंबा

दिल्ली: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत  स्थायी सदस्यत्वासाठी भारताला युनायटेड किंगडमनंतर फ्रान्सचा ) पाठिंबा मिळाला आहे. भारताबरोबरच जर्मनी, जपान आणि ब्राझील या देशांनाही पाठिंबा मिळाला.शुक्रवारी UNSC च्या सुरक्षा परिषदेत संबोधित करताना फ्रेंच उपप्रतिनिधी नॅथली ब्रॉडहर्स्ट एस्टिव्हलम्हणाल्या, "फ्रान्स कायमस्वरूपी जागेसाठी कायम सदस्य म्हणून जर्मनी, ब्राझील, भारत आणि जपानच्या उमेदवारांना समर्थन देईल. आम्हाला परिषदेच्या स्थायी सदस्यांसह आफ्रिकन देशांचे अधिक प्रतिनिधित्व हवे आहेत. कारण, भौगोलिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी अनेक जागा वितरित केल्या पाहिजेत."





यापूर्वी, यूकेनंही UNSC च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला होता. आम्ही भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलसाठी नवीन कायमस्वरूपी जागा निर्माण करण्यास तसंच परिषदेवर कायम आफ्रिकन प्रतिनिधीत्वास समर्थन देतो, असं संयुक्त राष्ट्रातील ब्रिटनच्या राजदूत बार्बरा वुडवर्ड यांनी सांगितलं. वुडवर्ड म्हणाल्या, 'यूके सदस्यत्वाच्या तात्पुरत्या श्रेणीच्या विस्तारास देखील आमचं समर्थन राहिल.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने