आता UPI पेमेंटवर येणार मर्यादा? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु

दिल्ली : कॅश न वारता फोनमधले पेमेंट अ‍ॅप्स वापरून व्यवहार करण्याचं प्रमाण सध्या वाढले आहे. लोकांनाही हा पर्याय सोयिस्कर वाटतो. पैशाचं पाकीट सांभाळण्यापेक्षा फोनवरून पेमेंट करण सोपं होतं. म्हणून जर तुम्हालाही अगदी बारीकसारीक खरेदीपासून मोठ्या व्यवहारापर्यंत सगळ्यासाठी UPI Payment करण्याची सवय असेल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठीच आहे.आता UPI पेमेंटवर निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक व्यवहाराप्रमाणेच UPI पेमेंट मर्यादा घालण्याचा संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत. युपीआय पेमेंटवर सध्या बहुतेक नागरिक अबलंबून आहेत. मात्र आता लवकरच युपीआय पेमेंटवर निर्बंध येण्याची शक्यता आहे.



आता UPI पेमेंटवर मर्यादा येण्याची चिन्हं

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. यामुळे मोबाईल ॲपद्वारे बँक खात्यात पैसे एकमेकांना पाठवता येतात. यासह, कोणताही वापरकर्ता अनेक UPI ॲप्ससह बँक खाते लिंक करू शकतो आणि व्यवहार करू शकतो. दरम्यान, आता UPI पेमेंट सेवा देणाऱ्या ॲप्ससाठी व्यवहार मर्यादा निश्चित करण्याची तयारी सुरू आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देशातील थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडरची (TPAP) व्हॉल्यूम कॅप 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची तयारी करत आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत चर्चा सुरू आहे. व्हॉल्यूम कॅप ( Volume Cap ) म्हणजे विशिष्ट प्रकारच्या खाजगी कंपन्यांसाठी कर-सवलत आहे.

थर्ड पार्टी UPI पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा लवकरच निश्चित केली जाऊ शकते, केंद्र सरकारकडून यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) थर्ड पार्टी UPI पेमेंटची एकूण व्यवहार मर्यादा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर RBI सोबत चर्चा करत आहे.या चर्चेत NPCI, वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) अधिकारी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. जर हा निर्णय मार्गी लागला तर गुगल पे आणि फोन पे सारख्या ॲप पेमेंटवर मर्यादा येतील. 31 डिसेंबर 2022 पर्यंत नवीन नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने