फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती? महाजनांनंतर खडसेंचं मर्मावर बोट

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद ऐन कडाक्याच्या थंडीत चांगलेच तापत चालले आहेत. काल खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी खडेसेंच्या मर्मावर बोट ठेवत खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता एकनाथ खडसेंकडून महाजनांच्या फार्म हाऊस प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

महाजनांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता खडेसेंनी महाजन यांची गेस्ट हाऊसवरील भानगड मी पाहिली आहे ? असं म्हंटल्याने खळबळ उडाली आहे. खडसेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. खडसेंनी फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली असल्याचे विधान केले आहे. एवढेच नव्हे त्यावेळी या प्रकरणावर वर्तमानपत्रात छापूनही येत असल्याचे म्हटले आहे.गिरीश महाजनांचे अनेक प्रेमसंबंध आहे. मात्र, आपण याचा कधी उल्लेख केला नसल्याचे एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असेही खडसेंनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझ्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा असे चॅलेंज खडसेंनी दिले आहे.




महाजनांचे विधान नेमकं काय?

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना मुलगा असता तर तो राजकारणात आला असता आणि सूनही राजकारणात आली असती असं विधान केले होते. मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही, मुली असणं देखील सुदैवच आहे. मी खूप आनंदी आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की, त्यांना एक मुलगा होता त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. मला हा विषय बोलायचं नाहीये पण, ते जर मझ्या मुलाबाळांबद्दल बोलत असतील तर खडसेंना एक मुलगा होता. ३२-३३ व्या वर्षी त्याचं काय झालं? हा संशोधनाचा विषय आहे? हे बोलणं त्यांना झोंबेल, मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं. आत्महत्या झाली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे, असे महाजन म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने