पोलिसांना सारखा फोन करणारा 'तो' चाणक्य कोण? चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल ठाणे पोलिसांनी अटक केली. ठाण्यात चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मात्र यामागे पोलिसांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांच्या पत्नी हृता यांनी देखील केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना म्हणाले की, मला केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात येत आहे. पुढे ते म्हणाले की, मला अटक व्हावी म्हणून पोलिसांना चाणक्यांचे वारंवार फोन येत होते, असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केलाय. आव्हाड यांना आज ठाणे सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी बोलताना आव्हाड यांनी हा आरोप केलाय. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. आव्हाड कोणत्या चाणक्याबद्गल बोलत आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



दरम्यान आव्हाड यांना आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेतली. नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप केले आहेत. ते म्हणाले कि, मी स्वत:हून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलो होतो. परंतु मला खोटं बोलवून अटक करण्यात आली, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.पुढे ते म्हणाले की, मला अटक व्हावी म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात येत आहे. पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते. फोनवरुन मला अटक करण्यास सांगितलं जात होतं, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. माझी अटक बेकायदेशीर आहे. अटक करताना नियमांचं पालन केलं गेलं नाही. प्रोटोकॉल पाळला गेला नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटंलं आहे.त्यामुळे आता हा चाणक्य कोण असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागला आहे. यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे माजी महापौर, भाजप नेते प्रवीण दरेकर या नावांवर ही सूई फिरत असून यापैकी कोणता चाणक्य आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने