तुरुंगातून बाहेर येताच राऊतांनी केलं फडणवीसांचं कौतुक, मोदी- शाहांची भेटही घेणार

मुंबईः तब्बल १०३ दिवसांनंतर शिवसेना नेते संजय राऊत जेलबाहेर आले. आज पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.''जेलमध्ये असतांना मी पेपर वाचायचो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि 'म्हाडा'ला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत.'' असं म्हणत सध्या राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, असं संजय राऊत म्हणाले.



दरम्यान, आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची भेट घेऊन आपल्यासोबत काय घडलं, ते सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबरोबच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार असल्याचं राऊतांनी सांगितंल.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलतांना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी एका भाषणात माझ्यावर टीका केली होती. मला ईडीकडून अटक होणार, त्यामुळे मी स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असं ते म्हणाले होते.

''हो केली मला अटक ईडीने आणि ती बेकायदेशीर होती. परंतु शत्रूबद्दलही असं बोलू नये. सावरकर, टिळक ज्याप्रमाणे एकांतात होते, त्याप्रमाणे मीही एकांतात होतो. माझी अटक राजकीय होती. मी माझा एकांत सत्कारणी लावला आहे." असं संजय राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने