दिवस रशिया एकतेचा, कौतुक भारतीयांचं; पुतिन भारतावर एवढे खूश का?

रशिया: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीयांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भारतीयांचा उल्लेख करतांना त्यांनी 'प्रतिभाशाली' ही उपाधी दिलीय. शुक्रवारी रशिया एकता दिवस संपन्न झाला. यावेळी बोलतांना पुतिन म्हणाले की, विकासाच्या बाबतीत भारत पुढे जाणार आहे. जवळपास दीड अरब लोक हे भारताची ताकद आहेत.''भारताकडे बघा, येथील लोक स्वतःच्या विकासासाठी जागरुक आहेत. ती प्रतिभा त्यांच्यात आहे. त्यामुळे निश्चितपणे भारताला याचा फायदा होणार आहे.''



व्लादिमीर पुतिन यांनी मागच्याच महिन्यामध्ये भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं होते. २८ ऑक्टोबरला ते म्हणाले की, रशियाचे भारतासोबत खास संबंध आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांना साथ दिलेली आहे. शिवाय भविष्यात हे नातं अबाधित राहिल, अशी पुष्टी त्यांनी दिलेली. पुतिन यांनी भारताबद्दलचं हे कौतुक मॉस्को येथील 'थिंक टँक वालदाई इंटरनॅशनल डिस्कशन क्लब' द्वारे आयोजित अधिवेशनात केलं होतं.आता तर पुतिन यांनी रशिया एकता दिनानिमित्त भारताचं कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने