अखेर धोतर फेडण्याची हौस पूर्ण; राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादीचं हटके आंदोलन

पुणे: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केल्याने वाद निर्माण झाला. ते मराठवाडा विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्यपाल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं.




दरम्यान, या व्यक्तव्यानंतर राज्यपालांवर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात राष्ट्रवादीने आक्रमक होत डमी राज्यपालांचे धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुण्यातील सावरकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा राज्यपाल यांच्या विरोधात देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच इतर राष्ट्रपुरुषांचा वारंवार अपमान करीत असतात. महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपाने या राज्यपालांना महाराष्ट्राचा वारंवार अपमान करण्यासाठी महाराष्ट्रात नेमलेले आहे अशी टीका राष्ट्रवादी कडून यावेळी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने