'नवाबांच्या शहरात तुझं स्वागत नाही...', लखनौमध्ये प्रियंकाचा का होतोय विरोध?

लखनौ: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी लखनौ येथील युनिसेफच्या ऑफिसला भेट दिली. तिनं औरंगाबाद येथील एक शाळा आणि आंगणवाडी केंद्राला देखील भेट दिली,जिथे तिनं मुलांसोबत वेळ घालवला,त्यांच्याशी संवाद साधला.मुलींच्या विरोधात होत असलेला भेदभाव आणि त्यांच्यावरील अत्याचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रियंकाचा या दौऱ्यामागचा हेतू होता हे तिच्या युनिसेफ आणि त्यासारख्या इतर संस्थांच्या भेटीतून निदर्शनास आले. यादरम्यान प्रियंकाला लखनौमध्ये विरोध करणारी घटनाही समोर आली. पण याचं कारण काय आहे.



त्याचं झालं असं की, प्रियंका लखनौमध्ये असताना तिला भेटण्यासाठी एक तरुण विजेच्या तारांची लांबलचक भिंत पार करुन आला,त्यानंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली. पण त्याबरोबर लखनौ येथील एका संघटनेने प्रियंकाच्या लखनौमधील दौऱ्याला विरोध करणारे पोस्टर्स लावत त्यावर लिहिले,''नवाबांच्या लखनौ शहरात तुझे स्वागत नाही''. यावरनं स्पष्ट होतं की प्रियंका लखनौला आलेलं काही लोकांना खटकलं.दौऱ्याआधी प्रियंकानं एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं होतं की,''आता मी लखनौ शहरात आहे,युनिसेफला भेट देण्यासाठी. मी या दौऱ्याची मनापासून वाट पाहत होते. मी माझ्या लहानपणी काही वर्ष लखनौच्या एका शाळेत काढली आहेत. माझ्या ओळखीतली काही कुटुंब आणि मित्रपरिवार येथे राहतो. उत्तरप्रदेश महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी चांगलं शहर बनलंय याविषयी जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. मला इथल्या बदलांना,सुधारणांना जाणून घ्यायची मनापासून इच्छा आहे. भारतात आजही लैंगिक असमानतेमुळे महिलांवर अत्याचार होताना दिसून येतो''.

प्रियंका पुढे म्हणाली, ''मुलींवर होणारे अत्याचार आणि भेदभाव संपुष्टात यावेत यासाठी लखनौमध्ये कार्यरत असणाऱ्या युनिसेफला मला भेट द्यायची आहे. या कार्यात त्यांना येणाऱ्या अडचणी मी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यासंदर्भात माझ्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. मी नेहमी बोलत आले आहे की,समाजाला उज्वल भविष्य देण्याची मोठी ताकद स्त्रियांमध्ये आहे. त्या मनात आणलं तर मोठ्यातल्या मोठ्या संकटांना तोंड देऊ शकतात''.प्रियंकाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यासोबत 'जी ले जरा' सिनेमात दिसेल. सिनेमा संदर्भात बोलताना प्रियंका म्हणाली,''मी माझ्या करिअरचा मोठा काळ सिनेसृष्टीत पुरुषप्रधान संस्कृतीच्या दबावाखाली घालवला आहे. हिरो ठरवतो,सिनेमा कुठे शूट करायला हवा,सिनेमात हिरॉईन कोण असेल. हे सगळं नैराश्यात नेणार होतं. आपण अशा युगात राहत आहोत जिथे महिलांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतः सक्षम होण्याची गरज आहे''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने