राहुल गांधी यांचा शरद पवार यांना फोन; काय आहे कारण?

नांदेड : भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील आजचा चौथा दिवस आहे. राहुल गांधींची आज नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला महाविकास आघाडीतील नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हजेर लावणार का याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी शरद पवरांशी दुरध्वनीवरुन संवाद साधला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पवार राहुल गांधी यांच्या फोननंतर सभेला हजेरी लावतील का? हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे. हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. या यात्रेत आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह सर्वेसर्वा शरद पवार सहभागी होतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र, हे सर्व त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे.



दरम्यान, राहुल गांधी यांनी शरद पवार यांना फोन करत त्यांच्या तब्येतेची विचारपूस केली. अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या या संवादामध्ये नेमका काय संवाद झाला हे अद्याप कळु शकलेलं नाही. पण आज पहिल्यांदाच राहुल गांधी जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.राहुल गांधींच्या या जाहीर सभेत महाविकास आघाडी सरकारमधील मोठे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री जयंत पाटील, मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, एच के पाटील, बाळासाहेब थोरात, राजू वाघमारे, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, नाना पटोले आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

नुकतंच शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने