बिसलेरी पाण्याला मिळणार 'टाटा'ची चव; 7000 कोटींचा करार होणार अंतिम!

मुंबई : टाटा समूहाची  कंपनी-टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड लवकरच 'बिसलेरी ब्रँड' आपल्या नावावर करणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तपत्रानुसार, हा करार 7000 कोटींमध्ये निश्चित होण्याची अपेक्षा आहे. पॅकेज्ड वॉटर मेकर बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आलीय.बाटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड बिसलेरी आता टाटा समुहाकडं  आला आहे. टाटा कन्झ्युमर कंपनीनं बिसलेरी ब्रँड विकत घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि बिसलेरी यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाहीये. जाणकारांच्या मते, हा करार अंतिम झाल्यानंतर टाटा समूहाची कंपनी वॉटर मार्केटमधील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास येऊ शकते. टाटा समूहाचा ग्राहक व्यवसाय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) अंतर्गत येतो.



रमेश चौहान  यांच्या अध्यक्षतेखाली हा ब्रँड भारतात चांगलाच फोफावला. त्यानंतर टाटांनी तब्बल 7 हजार कोटींना हा ब्रँड विकत घेतला. पुढील दोन वर्षे बिसलेरीचं मॅनेजमेंट विद्यमान कंपनीकडंच राहील. त्यानंतर टाटा कन्झ्युमर हे व्यवस्थापन ताब्यात घेईल. याआधी सुमारे 30 वर्षांपूर्वी रमेश चौहान यांनी थम्प्स अप  गोल्ड स्पॉट , लिमका हे कोल्ड ड्रिंक्सचे ब्रँडकोकाकोला  या अमेरिकन कंपनीला विकले होते.बाजार संशोधन आणि सल्लागार संशोधन यांच्या अहवालानुसार, भारतीय बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ FY2021 मध्ये US$ 2.43 अब्ज (अंदाजे 19,315 कोटी) पेक्षा जास्त होती. बाटलीबंद पाणी ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. बाजारात उघड्यावर मिळणाऱ्या सामान्य पाण्यापेक्षा ते अधिक स्वच्छ मानलं जातं. उघडे पाणी आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही आणि पिण्यासाठीही असुरक्षित आहे, असंही अहवालात नमूद आहे. कोका-कोला इंडियासह अनेक कंपन्या बाटलीबंद पाण्याच्या बाजारात त्यांच्या ब्रँडशी स्पर्धा करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने