'मला रडू येतं, त्यांनी नेहमीच....' श्रीवल्ली रश्मिकानं सांगून टाकलं

मुंबई :  श्रीवल्ली फेम रश्मिका ही सध्या एका पोस्टमुळे खूप चर्चेत आली आहे. तिनं मोठी पोस्ट शेयर करत आपल्याला गेल्या काही दिवसांपासून जो त्रास होतो आहे त्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आपण त्या आरोपांमुळे रडतो....मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं आव्हानात्मक आहे. असेही रश्मिकानं म्हटले आहे.




मी तुमच्यासाठी पंचिंग बॅग नाही....

रश्मिकानं तिच्या इंस्टावरुन खास पोस्ट शेयर करत नेटकरी आपल्याला कशाप्रकारे त्रास देतात हे सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मला खूप त्रास होतो आहे. एखाद्या गोष्टीवरुन लोकं वाट्टेल ते बोलताना दिसतात. ते खालच्या पातळीवर जाऊन आरोपही करत असल्याचे दिसून आले आहे. सगळ्यांसाठी मी पंचिंग बॅग झाली आहे. कुणीही काहीही विचार न करता मला बोलते. तेव्हा मला काय प्रतिक्रिया द्यावी. असा प्रश्न पडतो. असे रश्मिकानं म्हटले आहे.मी माझ्या आवडीनं एका करिअऱची सुरुवात केली आहे. अशावेळी त्याच्यातील बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरं जाण्याचं धाडस मी दाखवलं आहे. तेव्हा लोकं त्यावरुन ट्रोल करतात अशानं खूप रडू येतं. मला माहिती आहे की, सगळ्यांनाच मी आवडू शकत नाही. माझी तशी अपेक्षाही नाही. पण एका गोष्टीचा मला राग आहे तो म्हणजे तुम्ही माझ्याविषयी भलतं सलतं काहीही बोलू नका.

एवढं बोलून रश्मिका थांबलेली नाही. तिनं लिहिलं आहे की, मला नेहमीच सांगितले गेले की जे झाले ते विसरुन जा. त्याविषयी कुठेही काही बोलू नकोस. त्यामुळे मला काय करावे हे कळेना. मला यासगळ्या गोष्टींची खूप त्रास झाला आहे. हे सगळं सांगून मला कुणाला जिंकून घ्यायचे नाही. पण लोकांनाही कळावं की आपल्या मनोरंजन विश्वामध्ये नेमकं काय चालले आहे?दुलकर सलमाननं रश्मिकाला सपोर्ट केला आहे. त्यानं तिच्या पोस्टवर व्यक्त होत तिची पाठराखण केली आहे. याशिवाय अली अबराम, हंसिका मोटवानी यांनी देखील रश्मिकाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेम तुम्हाला अशा लोकांकडून मिळतं ज्या लोकांसारखे तुम्हाला व्हायला आवडते. आणि द्वेष अशा लोकांकडून ज्या लोकांसारखे तुम्हाला कधीच व्हायचे नसते. अशी प्रतिक्रिया सलमान दुलकरनं दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने