10 लाख लोकांचं रेशन कार्ड होणार रद्द, तुमचाही यात समावेश आहे का?

मुंबई - मोफत सरकारी रेशनचा भारतातील लाखो लोक लाभ घेतात. मात्र याच सुविधेचा गैरफायदा घेणारे आणि चुकीच्या मार्गानं रेशन मिळवणाऱ्यांना आता सरकार धारेवर धरणार आहे. कारण सरकारने आता त्या लोकांचं रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने देशभरातून 10 लाख फेक रेशन कार्ड समोर आणले आहे आणि आता हे फेक रेशन कार्ड लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकराच्या या निर्णयाने आता फसवणूक करणाऱ्यांना चांगलीच अद्ददल घडणार आहे. एवढंच काय तर जे फेक रेशन कार्डधारक समोर आले त्यांच्याकडून आता सरकार रेशनची वसूलीही करणार आहे.




कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सर्व रेशनकार्डधारकांना दर महिन्याला मोफत धान्य दिले जात आहे. सध्या देशात सुमारे 80 कोटी लोक याचा लाभ घेत आहेत. आता सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड’  लागू केले आहे. या बदलानंतर तुम्ही देशात कुठेही कोणत्याही राज्याच्या रेशनचा लाभ घेऊ शकता.मात्र आता देशात ज्या लोकांचे रेशन कार्ड बनावट आहेत त्यांचे रेशन कार्ड सरकार रद्द करणार आहे.

अपात्र रेशनकार्डधारकांची यादी सुरवातीला डीलरकडे पाठवली जाईल. यानंतर डीलर या लोकांचे राशन बंद करतील. तसेच डीलर्स नावे अधोरेखित करतील आणि अशा रेशनधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवला जाईल. त्यानंतर त्यांचे रेशनकार्ड रद्द केली जातील.'रेशन कार्डचे राशनसोबतच अनेक फायदे आहे. तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, तर तुम्हाला ओळख आणि रहिवासी पुरावाम्हणून रेशन कार्ड  वापरता येते. वाहन चालविण्याचा परवाना  बनवण्यासाठीदेखील हा वैध पुरावा मानला जातो. एवढंच काय तर रेशन कार्ड असल्यास एलपीजी कनेक्शन मिळणे सोपे होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने