धान्यनिर्यातीस रशिया अखेर तयार

किव्ह : काळ्या समुद्रातून धान्यनिर्यातीस परवानगी देणाऱ्या कराराची पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्याची तयारी रशियाने दर्शविली आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी आज ही माहिती दिली.रशियाने धान्यनिर्यात करार स्थगित केल्यामुळे आफ्रिकेला होणारा धान्यपुरवठा थांबला असून अन्नटंचाईचे संकट पुन्हा निर्माण झाले. आज रशियाचा विरोध असतानाही तीन जहाजे युक्रेनच्या बंदरातून बाहेर पडली होती.मात्र संयुक्त राष्ट्रांनीही जहाजांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला. तुर्कस्तान आणि संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी केल्यानंतर रशियाने कराराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.


जैविक अस्त्रांच्या दाव्यावर मतदान

न्यूयॉर्क : युक्रेनकडे जैविक अस्त्रे असल्याच्या रशियाच्या दाव्याची चौकशी करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत मतदान घेतले जाणार आहे. अमेरिकेच्या मदतीने युक्रेन जैविक अस्त्रांचा वापर करण्याची शक्यता असून युक्रेनकडे या अस्त्रनिर्मितीच्या प्रयोगशाळाही आहेत, असा रशियाचा आरोप आहे. रशियाने गेल्याच आठवड्यात ३१० पानांचा अहवाल सुरक्षा समितीमध्ये सादर करत चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे अशी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यासाठी मतदान घेतले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने