‘धर्मवीर’साठी प्रसाद ओकला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार! पोस्ट शेअर करत म्हणाला, “माझं भाग्य…”

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरदेखील तो सक्रीय असतो. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका होती. त्यानंतर त्याने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता.



प्रसादला दोन मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. नुकतीच त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘एकाच दिवशी दोन मोठे पुरस्कार!! . श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड्स फिल्म फेडरेशनचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ धर्मवीरसाठी आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान पुणे यांचा अभिनय संपन्न रंगकर्मी असे दोन पुरस्कार आज मिळाले.’ असा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे दोन मानाचे पुरस्कार मिळाल्याने त्याच्या चाहत्यांनीदेखील त्याचे अभिनंदन केले आहे.

धर्मवीर या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली. या चित्रपटाचा प्रवास त्याने ‘माझा आनंद’ असं या पुस्तकात लिहला आहे. प्रसाद ओक गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. मराठी नाटक, मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमातून त्याने काम केले आहे. अभिनेता होण्याऐवजी दिग्दर्शक होण्याचं त्याच स्वप्न होत असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होत.प्रसाद मूळचा पुण्याचा असून त्याने अभिनयनात करियर करण्यासाठी मुंबई गाठली. सुरवातीला संघर्ष करत त्याने आज स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने