शिवसेनेच्या शाखेवर शासनाची कारवाई.माजी आमदाराचा शिंदे गटाला सणसणीत टोला

मुंबई :  14 गावातील दहिसर येथील शिवसेनेची शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत महसूल विभागाने गुरुवारी जमीनदोस्त केली. शाखा जमीनदोस्त करण्यास शिंदे गटाचा पाठिंबा असून ठाकरे गटात मात्र नाराजीचे वातावरण आहे. दहिसर येथील शाखा तोडण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिंदे गटावर टिका करत शिवसेना प्रमुखांनी या शाखा उभारल्या होत्या. शिवसैनिक म्हणून काम करताना यांना शाखा अधिकृत वाटली, आता अनधिकृत वाटत आहे, आता ते शिवसैनिक नाहीत असा सणसणीत टोला लगावला आहे.कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील मुख्य दहिसर विभागीय शाखा महसूल विभागाने गुरुवारी जमीनदोस्त केली. शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. मात्र त्याच शाखेच्या परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई शासनाकडून करण्यात आलेली नाही. केवळ शिवसेनेची शाखा तोडल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये शिंदे गटाच्या विरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.



शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी गावागावात शाखा सुरू केल्या होत्या. आज याच शाखांवर हातोडा फिरवला जात आहे. दहिसर नाक्यावर असलेली शिवसेनेची शाखा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सुरु झालेली होती. शिवसेनेचे तत्कालीन दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी देखील या शाखेला भेटी दिल्या होत्या. मात्र याच शाखेवर शासनाकडून कारवाई करण्यात आल्याने शिवसैनिकांच्या ते जिव्हारी लागले आहे.शासनाच्या या कारवाई नंतर ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी नाराजी वाक्य केली आहे. भोईर याविषयी म्हणाले की, मला वाटत ही दुर्देवी घटना आहे. हा काळा दिवस माझ्या माहिती प्रमाणे आहे. कारण ज्या शिवसैनिकांनी, ज्या शाखा प्रमुखांनी त्या शाखा उभारल्या होत्या. त्या भागातील शेतकऱ्यांनी ज्यांना निवडून दिल त्यावेळस सर्व शिवसैनिकच म्हणून काम करत होते आणि तेव्हा त्यांना यासर्व शाखा अधिकृत वाटत होत्या.

मात्र आज अनधिकृत वाटत आहे. हे एकप्रकारच राजकारणच आहे असं मला वाटतंय. सर्व्हे नं. 63 यांच्यामध्ये आमची शिवसेनेची शाखा गेली 40 वर्ष पासून आहे.त्यांच्याखाली केंद्र शासनाचे पोस्ट ऑफिस होते, बाजूला ग्रामपंचायत च कार्यालय आणि त्यांच्यावरती सरपंचाच कार्यालय.असं असताना सुद्धा फक्त शिवसेनची शाखा तोडली जाते, याचा अर्थ हे राजकारण आहे, त्यावेळेस ते शिवसैनिक होते अता ते शिवसैनिक नाही अश्या पध्दतीचं हे राजकारण दुर्दैवी आहे. पण अश्या प्रकारच राजकारण करून लोकांच्या मनामधलं तुम्ही ज्यागोष्टी मध्ये विष पेरलंय त्यामुळे हा चिडलेला शिवसैनिक कधी माफ करणार नाही, अशी त्याभागातील शिवसैनिकांची भावना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने