देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा आक्षेप,

मुंबई : महाराष्ट्रातून चार ते पाच मोठे उद्योग परराज्यात गेले आहेत. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत बाजू मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारची बाजू मांडली. यावेळी फडणवीस यांनी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर फडणवीसांनी पत्रकारांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला. प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात गेले आणि पत्रकारांनी त्याचा गाजावाजा आमच सरकार आल्यानंतर केला असं फडणवीस बोलताना म्हणाले होते.




फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आमचं सरकार सत्तेत येऊन तीनच महिने झाले आहेत. याधीच प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत पण आमच सरकार आल्यानंतर उद्योग राज्याबाहेर चाललेत, असा फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. हा फेक नेरेटिव्ह तयार करण्यामध्ये काही राजकीय पक्ष आणि काही HMV पत्रकार एकत्रितपणे महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते.

काही HMV पत्रकार सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. सरकारबद्दल अपप्रचार करत आहेत फडणविसांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आणि यासंदर्भात ट्विट करत त्यांनी आपलं मत मांडलं आहे.

ट्विट करत रहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच #HMV म्हणजे #He_is_Maharashtra’s_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत, असं रोहित पवार म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने