भारतातील प्रत्येक व्यक्तीचा DNA एकच, तो म्हणजे हिंदू; मोहन भागवतांचं मोठं विधान

छत्तीसगड : सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लोकांच्या सर्वधर्मीय लोकांच्या एकत्र राहण्यावर आणि डीएनए संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए हिंदूच असल्याचे मोहन भागवत म्हणालेत. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारे देवांची पूजा, भक्ती केली जाते. ती कुणी बदलण्याची गरज नाहीये. कारण कोणत्याही माध्यमातून केलेली प्रार्थना एकाच ठिकाणी जाऊन पोहचते, असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत.



पुढे बोलताना ते म्हणाले की, जवळजवळ 40 हजार वर्षांआधीपासून अखंड भारताचा डीएनए एकच आहे. तर काबूलच्या पश्चिमेपासून ते छिन्दविन नदीच्या पूर्वेपर्यंत तिबेटच्या उत्तरेपासून म्हणजेच चीनपासून ते श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रदेशात जे लोक राहत आहेत त्या सर्व लोकांचा डीएनए 40 हजार वर्षांपासून एकच आहे. तेव्हापासून आपले पूर्वज एकसमान आहेत.भारतात राहणाऱ्याचा डीएनए एकच आहे. तो म्हणजे हिंदू, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.छत्तीसगड येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात हे बोलत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने