रब्बी हंगामात प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावा 'या' सरकारी योजनांचा लाभ

दिल्ली: सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून, अनेक ठिकाणी पेरणीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. आज आम्ही तुम्हाला या हंगामात प्रत्येक शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या काही खास योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यास नक्कीच मदत होईल.



सरकारच्या योजना कोणत्या?

राष्ट्रीय कृषी विकास योजना 

शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना भरड तृणधान्ये, मातीचे आरोग्य आणि पशुसंवर्धनासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. शेतकरी या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://rkvy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.

कृषी उडान योजना 

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांची पिके आणि इतर उत्पादने वेळेत बाजारपेठेत पोहोचवली जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी https://agriculture.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

पंतप्रधान पीक विमा योजना 

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान दूर करण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण विम्याच्या रकमेच्या रब्बी पिकासाठी 1.5 टक्के आणि खरीप पिकासाठी 2 टक्के प्रीमियम रक्कम भरावी लागते. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण विम्याची रक्कम मिळते, या योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी https://www.icar.org.in/en/node/2475 या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्ड योजना 

शेतीसाठी शेतकर्‍यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पैसे दिले जातात. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला कर्ज काढायचे असल्यास त्याने अधिक माहितीसाठी शेतकरी अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने