राऊतांविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्या न्यायाधीशांचा नकार; ईडीची पळापळ

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्याही न्यायाधीशांनी नकार दिला आहे. त्यामुळं ईडीची पुन्हा पळापळ होणार असून आता त्यांना तिसऱ्या न्यायाधीशांपुढं याचिका सुनावणीसाठी ठेवावी लागणार आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.यापूर्वी न्या. भारती डांगे यांच्यापुढं ही याचिका सुनावणीसाठी आली होती. पण हायकोर्टात ही असाईनमेंट बदलल्यानं ती पुढे न्या. कर्णिक यांच्याकडे आली. पण आता न्या. कर्णिकांनी या याचिकेवर वैयक्तिक करणामुळं सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळं आता ईडीला पुन्हा नव्या न्यायमुर्तींपुढं आपली याचिका दाखल करावी लागणार आहे.



संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी कोर्टाकडून 2 लाख रुपयांच्या रोख रमकेमवर जामीन मंजूर झाला. पण, त्याला स्थगितीची मागणी ईडीकडून लागलीच करण्यात आली. जामिनाला स्थगिती देण्याची ईडीने (ED) पीएमएलए कोर्टाकडे मागणी केली होती. राऊतांचा जामीन तातडीनं रद्द करत त्यांना पुन्हा ईडीच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी ईडीनं केली आहे.संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत तसेच ईडीच्या कारवाईवर शंका व्यक्त करत पीएमएलए कोर्टानं मोठा धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राऊतांना जामीन मंजूर झाला होता त्यामुळं ते १०० दिवसांनी तुरुंगाबाहेर आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने