तुम्ही नरमला आहात का? प्रश्न ऐकताच संजय राऊत म्हणाले “नेमकं म्हणायचं काय आहे, काय अर्थ…”

मुंबईः ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यहारप्रकरणी जामीन मिळाला असून तब्बल तीन महिन्यानंतर ते जेलच्या बाहेर आले आहेत. संजय राऊत बाहेर आल्यानंतर ठाकरे गटाकडून अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला असून पुन्हा एकदा ही तोफ धडाडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी उशिरा संजय राऊतांची मुक्तता करण्यात आली. दरम्यान, संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना काहीशी नरमाईची भूमिका घेताना दिसले. याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? अशी विचारणा केली.

संजय राऊतांनी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. “मी आगामी दोन ते चार दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेणार आहे. मला वाटतं की राज्यातील कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राज्य सरकार चालत आहे. राज्यातील महत्त्वाचे निर्णय हे तेच जाहीर करतात,” असं संजय राऊत म्हणाले.दरम्यान संजय राऊतांनी यावेळी तुम्ही नरमाईची भूमिका घेतली आहे का? अशी विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी नरम झालोय म्हणजे याचा काय अर्थ आहे? अशी विचारणा केली. यावर त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची वैगेरे भाषा करत असल्याबद्दल विचारण्यात आलं.



राज ठाकरेंना प्रत्युत्तर

“मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे, त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लाऊन घ्यावी, असं ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसंच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते. तशीच माझी अटकही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने