पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याचा आनंद केला साजरा, कोर्टाने सुनावली पाच वर्ष कारावासाची शिक्षा

जम्मू काश्मीर:  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बंगळुरुमधील विशेष न्यायालयाने हा निर्णय़ दिला असून, १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



सेंट्रल क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, फैज राशीद हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर त्याने फेसबुक पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला होता. तपासाचा भाग म्हणून फॉरेन्सिकडून मोबाईलची तपासणी करण्यात आली होती. पोलिसांनी विविध कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याला अटक करण्यात आली. फेब्रुवारी २०१९ पासून राशीद कारागृहात आहे. त्याची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. या प्रकरणात अनेक पोलीस कर्मचारीच साक्षीदार होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने