दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार नेटफ्लिक्सवर दाखल

मुंबई : २०२० मध्ये अनुष्का शर्माच्या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, राहुल बोस अशा कलाकारांनी काम केले होते. बालविवाह या प्रथेवर आधारलेल्या या चित्रपटाची पार्श्वभूमी ब्रिटीशकालीन बंगालमधल्या एका गावातली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तृप्तीच्या कामाचेही कौतुक झाले होते. याआधी तृप्ती आणि अविनाशची जोडी ‘लैला मजनू’ या चित्रपटामध्ये झळकली होती.



ती ‘काला’ (Qala) या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नेटफ्लिक्सच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. या पोस्टरमध्ये तृप्तीने भरीव साडी नेसली असून तिच्या हातांमध्ये तंबोरा आहे. यावरुन हा चित्रपट गायक किंवा संगीताशी संबंधित असणार असल्याचे लगेच लक्षात येते. चित्रपटातला तिचा क्लासी लूक या पोस्टरद्वारे समोर आला आहे.

या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान काम करणार आहे. हा त्याचा पहिला चित्रपट आहे. त्यानेसुद्धा हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पोस्टला त्याने ‘तिच्यासाठी आयुष्य म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे तिची आई”, असे कॅप्शन दिले आहे. ‘या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे’, असे बाबिलने म्हटले होते.हा चित्रपट १ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. १९४० च्या काळातल्या नामांकित तरुण पार्श्वगायिकेची कथा आहे असे नेटफ्लिक्सच्या वृत्तामध्ये नमूद केले होते. अन्विता दत्त यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. अनुष्काच्या भावाने, कर्णेश शर्माने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या तिघांनी ‘बुलबुल’मध्ये एकत्र काम केले होते. काला चित्रपटाबद्दल अन्विता दत्त यांनी “मी आणि कर्णेश आम्हा दोघांसाठी हा चित्रपट खूप खास आहे. १९३०-४० च्या काळामधील सेट तयार करण्याचे आव्हान आमच्या समोर होते. नेटफ्लिक्सच्या साथीने आम्ही ही कथा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याबरोबरचा हा माझा दुसरा चित्रपट आहे, ‘काला’ बनवताना मला दुप्पट मजा आली”, असे वक्तव्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने