विकासकामांना स्थगिती देऊ नये; अजित पवारांनी राज्य सरकारला ठणकावलं

मुंबई :  बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत जिल्हा नियोजन समितीच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मान्यता दिली. यात अपेक्षेप्रमाणे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सुचविलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. दरम्यान, यावरुन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला ठणकावलं आहे.शिर्डी येथे राष्ट्रवादीचे २ दिवसीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी अजित पवार बोलत होते. अजित पवारांनी अनेक मुद्यावर यावेळी भाष्य केले. तसेच, सरकारच्या स्थिरतेबाबतही मोठं विधान केलं. जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल अस अजित पवार म्हणाले.



काय म्हणाले अजित पवार?

आर आर पाटील असताना १३ हजारांची पोलिस भरती केली होती. अनेक विभागाची भरती आमच्या सरकारच्या काळात काढली होती. पण, स्वतःच अपयश झाकण्याकरता शिंदे - फडणवीस सरकारने दीड दीड कोटी गुंतवणुकीचे असणार प्रकल्प बाहेर गेले आणि आता सांगत आहेत की, अनेक प्रकारचे प्रकल्प आणून इथे भरती करणार आहोत. तर असे असेल तर त्याची यादी दाखवा अशी खोचक मागणी अजित पवार यांनी यावेळी केलीदेशसह राज्यभरात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. याची चिंता राज्य सरकारला सतावत आहे. अशातच मोठ मोठे प्रकल्प बाहेर गेल्याने तरुणांमध्ये नाराजी आहे. त्याचा फटका आपल्याला बसू नये म्हणून वरचे वर असा काही तरी देखावा करण्याचा केविलवाणा प्रयत्न काल राज्य सरकारने केला. असा खोचक टोला पवारांनी यावेळी लगावला.

महाविकास आघाडी सरकारची स्थिती दोलायमान असतानाच्या काळात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ऐनवेळी मंजूर करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची कामे पुन्हा तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, अजित पवार यांनी सुचविलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. यासंदर्भातही अजित पवारांनी भाष्य केलं.याविषयी मला अधिक माहिती नाही. माहिती घेतल्याशिवाय मी कोणतेही भाष्य करणार नाही. लोकशाहीमध्ये सत्ता येत असते जात असते. विकासकामाला स्थगितीपण द्यायची नसते. आणि कोणी विकासकाम मंजूर केली असेल तर आडवा आडवीही करु नये. अशा शब्दात अजित पवारांनी राज्य सरकारला ठणकावलं.तसेच सरकारच्या स्थिरतेबाबतही मोठं विधान केलं. जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल अस अजित पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने