गावकमानी जवळ गॅस टँकरचा अपघात ; गॅस गळती सुरूच

बोरपाडळे : बोरपाडळे,ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर या गाववेश कमानीजवळ ,भोपतळी भागात रात्री जयगडहून नागपूरकडे जाणारा गॅस टँकर क्रमांक GJ 06 AX 3642 चा अपघात होऊन पलटी झाला.सुदैवाने जीवीतहानी झाली नसली तरी गॅस टँकरची गॅसटाकी लिकेज होऊन गॅस गळती चालू झाल्याने प्रशासनासह सर्वांची तारांबळ उडाली.

वाठार ते कोडोली ते बोरपाडळे पुढे बोरपाडळे फाटा हा रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करणेत आलेला आहे. बोरपाडळे रोड वाहतूकीस बंद असून आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी याठिकाणी तहसीलदार रमेश शेडगे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन महानगरपालिका कोल्हापूरचे दस्तगीर मुल्ला आणि शीतलकुमार डोईजड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोडोली पोलीस स्टेशन आदी अधिकारी रात्रभर याठिकाणी थांबून आहेत.



सध्या 250 मिटर परिसरात गॅस पसरला असल्याचे जिल्हा आपत्ती अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी सांगितले.नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.सदर प्रवण क्षेत्रातील नागरिकांना हलवण्यात आले आहे. याठिकाणी यापूर्वीही असे गॅस टँकरचे अपघात झाले असल्याची चर्चा घटनास्थळी होती. कोडोली पोलीस कर्मचारी ,आपत्ती व्यवस्थापनचे जवान यांचा कडक पहारा दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने