ऐन थंडीत चहा महागणार; मदर डेअरीने देखील वाढवले दुधाचे दर

मुंबई : दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागताना दिसत आहे. महागाईतून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळताना दिसत नाही. दरम्यान आता दुधाचे दर पुन्हा वाढले आहेत. मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली असून फुल क्रीम दूध आता 63 रुपयांऐवजी 64 रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे एक रुपयांनी वाढ केली आहे.दरम्यान मदर डेअरीने टोकनयुक्त दुधाच्या दरातही दोन रुपयांची वाढ केली आहे. 



मदर डेअरीने टोकन दुधाच्या दरात प्रतिलिटर 48 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत दरवाढ केली आहे. मदर डेअरीच्या वाढलेल्या किमती आज (सोमवार)पासून लागू केले जाणार आहेत. दरम्यान, मदर डेअरीने इतक्यात चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ केलीय.16 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर शहरांमध्ये गायीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली करण्यात आली होती. याआधी मार्च आणि ऑगस्टमध्येही दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने